मृतांची संख्या नगरपरिषदेला माहितच नाही?

गोंदिया: शासनाच्या नियमानुसार कोरोना संसर्गाने मृत्यू होणाऱ्या रूग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी नगरपरिषदेला माहिती देणे अनिवार्य असतानादेखील गोंदिया शहरात कोरोनाने मृत झालेल्या रूग्णांची माहिती नगरपरिषदेला न देता परस्पर कोरोना रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तसेच मृताच्या नातेवाईकांकडून अंत्यसंस्कार आणि रूग्णावाहिकेच्या नावावर 30 ते 40 हजार रूपये घेतले जात असल्याचा प्रकार नगरपरिषदेचे सभापती दिनेश पंचबुद्धे यांनी चव्हाट्यावर आणला आहे.

याबाबत नगरपरिषदेने वारंवार सहयोग रूग्णालयाकडे माहिती मागितली. मात्र रूग्णालय प्रशासनाने टाळाटाळ केली आहे. त्यामुळे या रूग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Exit mobile version