Tue. Jul 27th, 2021

पुण्यातल्या भाडेकरूंसाठी Good News!

पुण्यामध्ये हजारो भाडेकरुंना मोफत घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जुन्या भाडेकरुंना याचा फायदा होणार आहे. भाडेकरुंना मोफत घर मिळत असताना, घरमालकांना मात्र त्याचा भुर्दंड बसणार नाही. तर,घरमालकांचाही यात फायदाच होणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातील शासनादेश काढला आहे.

पुण्यात पेठांमधील जुने वाडे आणि उपनगरातील तीस वर्षांहून जुन्या इमारतींची संख्या पाच हजारांहून जास्त आहे.

हे जुने वाडे आणि इमारतींमधून लाखो नागरीक राहतायेत.यात जसे घर मालक आहेत तसेच भाडेकरु देखील मोठ्या संख्येने आहेत.

भाडेकरू आणि घरमालक तयार असले तरी, या मिळकतींचा पुनर्विकास रखडला आहे.

त्याची मुख्य दोन कारणं होती.

  1. सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर टीडीआर चढवता येत नव्हता.
  2. भाडेकरुंना घर दिल्यानंतर प्रचलित एफएसआय नुसार घरमालकांना जागा शिल्लक राहत होती. त्यामुळं हा व्यवहार आतबट्ट्याचा होत होता.

मात्र आता या दोन्ही अटी रद्द करण्यात आल्या आहेत.

भाजप नगरसेवक गणेश बीडकर यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने या संदर्भातील शासनादेश काढला आहे.

जुने वाडे आणि इमारतींच्या पुनर्विकासा संदर्भातील नवीन शासनादेशामुळं…

  1. जुन्या वाड्यांचा विकास करताना दीड एफएसआय मिळणार आहे.
  2. भाडेकरुंना तीनशे चौरस फुटांची सदनिका मोफत मिळणार आहे.
  3. भाडेकरुकंडे तीनशे चौरस फुटांपेक्षा कमी जागा असेल तरीही तीनशे चौरस फुटांची सदनिका मोफत मिळणार आहे.
  4. तीनशे चौरस फुटांपेक्षा कितीही जास्त जागा भाडेकरुकंडे असेल तर, 370 चौरस फुटांची सदनिका मोफत मिळेल. त्यापेक्षा अधिक हवी असेल तर बाजारभावाप्रमाणे पैसे द्यावे लागतील.
  5. घरमालकांना दीड एफएसआय, आणि त्याचबरोबर भाडेकरुंना दिलेल्या जागेच्या दीडपट बांधकाम करता येणार आहे.
  6. उपनगरातील तीस वर्षाहून जुन्या आणि सहा मीटर रुंद रस्त्यावर असलेल्या इमारतींना पुनर्विकास करताना, नऊ मीटर रस्त्याचा एफएसआय मिळणार आहे.

तसेच, TDR देखील चढवता येणार आहे.

या निर्णयामुळे घरमालक आणि भाडेकरू दोघेही खुश आहेत.

वर्षानुवर्षांच्या वास्तव्यामुळं भाडेकरुंचं परिसराशी भावनीक नातं तयार झालेलं असत.

त्यामुळं ते दुसरीकडे जायला तयार नसतात.

या निर्णयामुळे भाडेकरुंना तिथंच घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसंच जुने वाडे आणि इमारतींचाही पुनर्विकास होईल.

मात्र यासाठी आता वाडा मालक व भाडेकरू एकत्र येण गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *