Maharashtra

पुणेकरांसाठी गुडन्यूज! यंदा पुण्यात साजरी होणार ‘दिवाळी पहाट’

पुणे : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी दिवाळी भेट दिली आहे. पुण्यात कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे निर्बंध शिथील करून जिल्ह्यात आठवडे बाजार सुरू करण्याचे निर्देश अजित पवारांनी पुणेवासियांना दिले आहेत. तसेच दिवाळी पहाटचे कार्यक्रम साजरे करण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. ‘सर्वांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याने १ कोटी १७ लाख लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. लसीकरण न झालेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे असे पवार म्हणाले. तसेच कोरोना संसर्ग अधिक असलेल्या भागांत लक्ष देण्याच्या सूचनाही पवारांनी दिल्या आहेत.

मागील तीन आठवड्यांत पुणे पालिका क्षेत्रात तसेच पुणे ग्रामीण भागांत शून्य मृत्यूची नोंद झाली. ग्रामीण भागात १० ठिकाणी विकेंड कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ‘मिशन युवा स्वास्थ’ मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत ८ ते २० ऑक्टोबर दरम्यान ४ लाख २७ हजार लसीकरण करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

जिल्ह्यात लसीकरण चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे अजित पवारांनी सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सिरम इन्स्टिट्यूट यांचे आभार मानले आहेत.

pawar sushmita

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

5 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

6 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

6 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

6 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

6 days ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

6 days ago