Sat. Oct 16th, 2021

#IndiaElections2019 गुगलचे डुडलच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले असून महाराष्ट्रात 7 मतदारसंघात मतदान होत आहे. दिग्गज लोकांसह गुगलनेही डुडलच्या माध्यमातून भारतीयांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

गुगलचे मतदान करण्याचे आवाहन –

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातीस मतदानाला आज सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात 7 मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

दिग्गज लोकांसह गुगलनेही मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

भारतीयांनी मतदान करावे असे आवाहन या डुडलच्या माध्यमातून सांगितले आहे.

या डुडलमध्ये मतदाराच्या बोटाला लावण्यात येणाऱ्या शाहीला दाखवण्यात आले आहे.

या डुडलवर क्लिक केल्यावर How to vote अशी प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा –

सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

महाराष्ट्रात 7 मतदारसंघात मतदान सुरू आहे.

विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात मतदान सुरू आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *