Fri. Sep 24th, 2021

लवकरच Google चं ‘जाणतो मराठी, वाचतो मराठी’!

Google Assistant साठी गुगलने आता एक नवं फीचर आणलं आहे. या फीचरमुळे आता Android स्मार्टफोनवर डिजिटल असिस्टंट वेब पेज आता आपल्या मातृभाषेत वाचून दाखवणार आहे. या फीचरला Read It असं नाव देण्यात आलं आहे. हे फीचर युजर्सना स्मार्टफोनवरचा कॉण्टेण्ट त्यांच्या भाषेत वाचून दाखवणार आहे.

 काय आहे ‘Read It’?

‘Read It’ हे गुगलचं नवं फीचर भारतीय भाषांना सपोर्ट करतं.

Google Assistant सुरू करण्यासाठी ‘Hey Google’ किंवा ‘Hello Google’ बोलायला लागतं.

त्यानंतर वेब पेज वाचून दाखवण्यासाठी Read It कमांड द्यावी लागते.

त्यानंतर हे फीचर तुम्हाला तुम्ही सांगाल त्या भारतीय भाषेत वेब कॉण्टेण्ट वाचून दाखवतं.

हे फीचर 28 भारतीय भाषांना सपोर्ट करतं. यात अर्थातच मराठी भाषा आहे.

मराठी व्यतिरिक्त हिंदी, उर्दू, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, पंजाबी, बंगाली, गुजराती अशा भारतीय भाषांचा समावेश आहे.

एवढंच नव्हे, तर वेगवेगळ्या 42 भाषांमध्ये हे फीचर वेब पेजसाठी लाईव्ह ट्रान्सलेशनसुद्धा करणार आहे.

म्हणजे इंग्रजीत लिहिलेला मजकूर तुमच्या मागणीनुसार मराठीत वाचून दाखवला जाणार आहे.

त्यामुळे इंटरनेटवरील विविध लेख, ब्लॉग, बातम्या, संदेश हे फीचर मराठीत वाचून दाखवणार आहे.

सध्या Read It फक्त इंग्रजी वाचतं. मात्र हे फीचर लवकरच अपडेट होऊन तुम्हाला मातृभाषेत मोबाईलवरील टेक्स्ट वाचून दाखवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *