Fri. Sep 30th, 2022

#RepublicDay2019: प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलनं साकारलं ‘हे’ खास डुडल

देशभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. भारताच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने ‘डुडल’च्या माध्यमातून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती भवन आणि राजपथावरील सामर्थ, संस्कृती आणि वैविध्यता गुगलने आपल्या डुडलच्या माध्यामातून साकारली आहे. ही वैविध्यता 7 रंगात दाखवण्यात आली आहे.

गुगलच्या डुडलमध्ये भारताचे सामर्थ 7 रंगात उठून दिसत आहे, भारतात पहिला प्रजासत्ताक दिन 1950 साली साजरा करण्यात आला होती.

1950 रोजी आपल्याला भारताचे संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रुपात भारताचे प्रथम राष्ट्रपती लाभले होते.

भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचीही परंपरा सुरू झाली.

पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो भारताचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.