गुगल झालं 20 वर्षांचं!
आपल्याला देशातील कुठल्याही गोष्टीबद्दल काहीही जाणून घ्यायचे असेल तर आपण ज्याची मदत घेतो, आणि एखाद्याचा बर्थडे कधी आहे, तसेच ज्याला एखाद्या माणसाची माहिती त्या माणसापेक्षा अधिक असते, त्या गुगलचाचं आज वाढदिवस आहे.
आपल्या सर्वांचा दोस्त, शिक्षक, माहितीदार असा गुगल आज 20 वर्षांचा झाला आहे.
24 तास सर्वांच्या सेवेत तत्पर असणारा गुगल 21व्या वर्षात पदार्पण करत आहे.
यानिमित्त गुगलनेच खास डूडल देखील तयार केलं आहे.
1998 साली गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता, पण तरीही तारखेवरुन वाद कायम होता.
त्यानंतर 17व्या वाढदिवसापासून 27 सप्टेंबरलाच गूगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला.
त्यानुसार हिशोबाने आज गूगलचा 20वा वाढदिवस आहे, 4सप्टेंबर1998 रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आले.
लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना झाली आणि आज तर इंटरनेट सर्च इंजिनचं जायंट म्हणून गूगलकडे पाहिले जातं.
भारतात Google.co.in ही सेवा मराठी, हिंदीसह 9 भारतीय भाषांत उपलब्ध आहे.
गुगलने मागील 20 वर्षांत यशाची उत्तुंग झेप घेतली आहे, माहितीचे सारे युग गुगलने आपल्यात सामावून घेतला असून जगापुढे माहितीचे भांडार खुले करून दिले आहे.