‘सौंदर्याची राणी’ मधुबालाच्या वाढदिवसानिमित्त गुगलचं खास डुडल

आपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी तसेच ‘सौंदर्याची राणी’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री मधुबाला हिची आज 86वी जयंती आहे.

आजच्या या दिवसाची विशेष आठवण म्हणून गुगलने एक खास डुडल तयार केले आहे.

14 फेब्रुवारी 1933 रोजी जन्मलेल्या मधुबालाचे मूळचे नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी असे होते.

गुगलने आजच्या दिवशी एक खास डुडल तयार करुन मधुबालाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.

गुगलने मधुबालाचे नृत्य करीत असलेले खास डुडल तयार केलं आहे.

मधुबालाने ‘बसंत’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘नीलकमल’ या सिनेमात मधुबाला मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती.

या सिनेमानंतर मधुबालाला ‘सौंदर्याची राणी’ या नावाने ओळखले जावू लागले.

मधुबालाने केवळ सिनेसृष्टीवर राज्य केले नाही तर तिने अनेकांच्या मनावरही अधिराज्य गाजवले.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणताच सर्वात आधी मधुबालाचे नाव समोर येते. लाखो दिलांची धडकन म्हणून ती आजही ओळखली जाते.

13 फेब्रुवारी 1969 रोजी अवघ्या 36व्या वर्षी मधुबालाचे निधन झाले.

मधुबालाला हृदयाचा त्रास होता. अनेकदा सिनेमाच्या सेटवर तिची प्रकृती बिघडायची.

उपचारासाठी ती लंडनला गेली. परंतु, सर्जरी करण्यास डॉक्टरांनी नकार दिला.

शस्त्रक्रिया करताना तिचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांना वाटत होती.

मधुबालाच्या निधनानंतर 2 वर्षानंतर तिचा 1971 साली ‘जलवा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

 

Exit mobile version