Fri. Jun 21st, 2019

कॉफीचे संशोधक फ्रीडली फर्नेन यांना Googleची अनोखी आदरांजली

16Shares

गुगलने आज जगप्रसिद्ध फ्रीडली फर्नेन यांच्या जन्मदिनानिमित्त खास डुडल तयार केले आहे.

कॉफीचा शोध लावणाऱ्या फ्रीडली फर्नेन रंज यांची आज 225 वी जयंती आहे.

त्यांच्या सन्मानासाठी गुगलने हे खास डुडल तयार केले आहे. फ्रीडली यांच्या जयंतीनिमित्त गुगलने कॉफीच्या रंगाचा डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

8 फेब्रुवारी 1794 रोजी जर्मनीत जन्मलेल्या फ्रीडली फर्नेन रंज यांनी 1819 मध्ये कॉफीचा शोध लावला. जर्मन भाषेत याला Kaffee म्हणून ओळखलं जायचं.

त्यानंतर याची Coffee म्हणून जगभरात ओळख निर्माण झाली. केमिकल इतिहासात मोठे नाव असूनही 1852 मध्ये एका केमिकल कंपनीच्या मॅनेजरने रंज यांना कामावरून काढले.

फर्नेन रंज यांची आर्थिक परिस्थिती नाजूक राहिली. त्यांना त्यांचे संपूर्ण आयुष्य गरीबीत काढावे लागले. 25 मार्च 1868 मध्ये वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

त्यांच्या कार्याची दखल घेत गुगलने आज त्यांच्या जयंतीनिमित्त खास डुडल तयार केले आहे.

फ्रीडलीब फर्नेन रंज हे गुगलने तयार केलेल्या कॉफीच्या रंगातील डुडलमध्ये दिसत आहेत.

फ्रेडलिब यांनी स्वतः कॉफीचा कप हातात पकडला असून ते कॉफी पिताना दिसत आहेत, यामध्ये त्यांच्या बाजुला एक मांजरही बसलेली दिसून येत आहे.

16Shares

Leave a Reply

%d bloggers like this: