Sun. Oct 17th, 2021

वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्या 100व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल

भारतीय वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्या 100व्या जयंती निमित्त गुगलने खास डुडल तयार केली आहे. भारतातील स्पेस प्रोग्रामचे जनक म्हणून विक्रम साराभाई यांची ओळख आहे. तसेच ISROची स्थापना सुद्धा विक्रम साराभाई यांनी केली आहे. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी अहमदाबादमध्ये झाला. साराभाई यांना 1962 साली शांति स्वरुपात भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोण आहेत विक्रम साराभाई ?

विक्रम साराभाई हे प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक होते.

त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी अहमदाबादमध्ये झाला.

भारतातील स्पेस प्रोग्रामचे जनक अशी त्यांची ओळख आहे.

त्याचबरोबर 1962 साली त्यांना शांति स्वरुपात भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

1966 साली पद्म भूषण तर 1972 साली पद्म विभूषणने सन्मानित करण्यात आले आहे.

फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची अहमदबादमध्ये स्थापना केली आहे.

त्याचबरोबर पीआरएल या संस्थानाची स्थापना विक्रम साराभाई यांनी केली आहे.

विक्रम साराभाई यांनी SITE लॉंच करण्यात मोठी भूमिका मांडली आहे.

देशातील पहिले सॅटेलाईट आर्यभट्ट लॉंंच करण्यात विशेष भूमिका साकारली आहे.

1971 साली वयाच्या 52 वर्षी विक्रम साराभाई यांचे निधन झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *