Tue. Aug 3rd, 2021

आजचे Google Doodle चार्ल्स मिशल डुलिपि यांना समर्पित

आज Google ने 24 नोव्हेंबरला त्याचे डुडल चार्ल्स मिशल डुलिपि यांना समर्पित केले आहे. त्यांना मुक-कर्णबधिरांचा पिता, मसीहा असे म्हणतात. आज चार्ल्स मिशल डुलिपि यांची 306 वी जयंती आहे.

मिशल यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1712 रोजी फ्रान्समधील वर्साइल येथे झाला. त्यांनी आपल्या आयुष्यात बधिर लोकांसाठी खूप काम केले. त्यांनी मुक-कर्णबधिर लोकांसाठी पहिले साइन अल्फाबेट बनवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य घालवले.

मुक-कर्णबधिर लोकांना संवाद साधता यावा यासाठी मिशल यांनी साइन अल्फाबेटची संपूर्ण प्रणाली तयार केली. चार्ल्स मिशल डुलिपी यांनी स्वतःच्या खर्चाने शाळा सुरू केली. त्यांच्या या कार्यासाठी, फ्रेंच संसदेने त्यांना Benefactor of Humanity ही उपाधी दिली. याशिवाय, लोकांच्या मूळ हक्कांच्या कायद्यामध्ये मुक-कर्णबधिर लोकांच्या हक्कांचाही समावेश केला.

डुलिपी यांनी हाताने इशारा करुन संभाषणाचा अर्थ समजून घेतला आणि मुक-कर्णबधिर लोकांना वेगळी अशी चर्चा करण्यासाठी अक्षरमाला दिली. सामान्य लोक जे बोलतात ते कानांनी ऐकतात आणि समजतात. मुक-कर्णबधिर लोकांनी आपल्या डोळ्यांनी शिकायला हवे अशी त्यांची मान्यता होती, आणि म्हणूच त्यांनी ही कार्यप्रणाली तयार केली. वयाच्या 77 व्या वर्षी 23 डिसेंबर 1789 रोजी पॅरिसमध्ये डुलिपी यांचा मृत्यू झाला.

आजचा Google Doodle एक एनिमेटेड डूडल आहे. यात 6 लोक एकमेकांना इशारा करत बोलत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *