Jaimaharashtra news

world wide web ला 30 वर्ष पूर्ण! गुगलनं साकारलं ‘हे’ खास डुडल

सर्च इंजिन गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असते. तर कधी महत्त्वाच्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असते.

www म्हणजेच world wide web ला आज 30 वर्ष पूर्ण झाली आहेत.

यानिमित्त गुगलने इंटरनेटच्या जन्मदिनी एक खास डुडल तयार केले आहे.

कोणत्याही वेबसाइटच्या आधी world wide web (www) दिसल्यानंतरच वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचे ग्रुप असतात.  त्यांना एकत्र जोडून वेबसाइट तयार केली जाते.

वैज्ञानिक टीम बर्नर ली यांना या शोधाचे श्रेय जाते.

गुगलने हे खास डुडल तयार करताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाला ही सलाम केला आहे.

एखादी वेबसाइट ओपन करण्यासाठी त्याआधी www टाकावे लागते. त्याशिवाय वेबसाइट ओपन होत नाही.

world wide web ला आज 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुगलने खास डुडल तयार केले आहे.

जगाला इंटरनेटची विशेष भेट देणाऱ्या टीम बर्नर ली यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला.

क्विंस कॉलेज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी 1976 साली फिजिक्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर त्यांनी इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेब तयार केले.

वर्ल्ड वाइड वेबला आधी सर्नने आपल्या अधिकारात ठेवले होते. मात्र 1992 साली ते सार्वजनिक करण्यात आले.

1993 साली संपूर्ण जगाला याचे अ‍ॅक्सेस देण्यात आले. www समजून घ्यायचे असेल तर या पेजवर एक टेक्स्ट, फोटोज, व्हिडिओ आणि इतर मल्टीमीडिया आपल्याला दिसेल.

या सर्वांना एकत्रित जोडण्यासाठी एका हायपरलिंकची मदत होते. इंटरनेटहून माहिती मिळवण्यासाठी www काम करते.

सर्व फाईल्स आणि पेजेसला आदान-प्रदान करण्याचं महत्त्वाचं काम www करत असते.

Exit mobile version