Fri. Sep 30th, 2022

गुगलचे नवे डुडल, आकाशात दिसणार ‘असे काही’

गुगल नेहमीच खास दिवसाचे महत्व बजावत डुडल बनवत असते. आज गुगलने नेहमीप्रमाणे उल्काचे शानदार डुडल काढले आहे. गुगलने डुडलद्वारे उल्कावृष्टीचे शानदार दृश्य सादर केले आहे. 13 डिसेंबर 2018 रोजी मध्यरात्री आकाशात उल्कांचा (Meteor) वर्षाव दिसणार आहे.

उल्कावृष्टी म्हणजे नेमके काय?

 •  अवकाशातून पृथ्वीवर येऊन कोसळणाऱ्या घन पदार्थाला उल्का (मिटिऑर) म्हणतात.
 •  उल्कांच्या (Meteor) वर्षावाला ‘जेमिनिड मीटियोर शॉवर’ म्हटले जाते.
 •  Phaethon मधील एस्ट्रॉयडमुळे उल्कावृष्टी होते.
 •  दरवर्षी किमान दहा ते बारा उल्का पृथ्वीजवळून जात असतात.
 • त्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात.
 •  तिचा कोसळण्याचा वेग घर्षण निर्माण करतो आणि तो घन पदार्थ चमकतो.
 •  बहुतेक उल्कापातांची नोंद अशा पडताना दिसण्यातून आणि लगेच जमिनीवर पडलेल्या गोळा करण्यातून होत असते. अशा प्रकारच्या नोंदींना ‘फॉल’ असं म्हणतात.
 •  उल्का कोसळल्यावर मात्र ती बरीचशी दगडासारखीच दिसते म्हणून तिला उल्कापाषाण किंवा अशनी असं संबोधलं जातं.
 • असे उल्कापाषाण उल्कापातावेळी पडताना दिसले नाहीत पण ते नंतर जमिनीवर सापडले तर त्या उल्कापाताच्या नोंदीस ‘फाइंड’असं म्हणतात.
 •  आजपर्यंत पृथ्वीवर सुमारे १५० उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत.
 • अजूनही काही उल्का पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. त्यापैकी काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात.

उल्कांचा वर्षाव पाहायचे आहे तर तुम्हाला शहरापासून लांब जावे लागेल. प्रत्येकवर्षी डिसेंबर महिन्यात उल्कावृष्टी होते.

वातावरण अनुकुल असेल तर आज उल्कांचा वर्षाव व्यवस्थित पाहता येईल. ढगाळ वातावरण असल्यास उल्का पाहता येणार नाहीत. उल्का पाहण्यासाठी डेलिस्कोप किंवा बहायोकुलरची गरज भासणार नाही. रात्री ९ नंतर तुम्ही उल्कांचा वर्षाव पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.