Thu. Jan 27th, 2022

हायस्पीड इंटरनेटसाठी Elon Musk ची Google सोबत डील

तंत्रज्ञान क्षेत्रात Elon Musk हे नाव सगळ्यांनाच परिचित आहे. सध्याला ते हाय स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करण्याच्या दिशेने स्थिरपणे कार्यरत आहे. ही स्पीड वाढविण्यासाठी, Elon Musk ने Google सह भागीदारी केली असल्याची याची घोषणा गुगलने केली. तसेच या भागीदारी अंतर्गत, स्टारलिंक सॅटालाईट Google द्वारे संगणकीय आणि नेटवर्क संसाधने प्रदान केली जाईल. SpaceX गुगल डेटा सेंटरमध्ये एक ग्राऊंड स्टेशन स्थापित करेल, जे SpaceX उपग्रहाशी जोडले जाईल. येत्या काही दिवसांत जगातील अनेक भागात हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध होईल. तसेच या वर्षाच्या अखेरीस भारतात हे लॉन्च केले जाऊ शकते, जी जीओसाठी डोकेदुखीचे कारण देखील बनू शकते. जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीचे ४०० दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत. लवकरच Jio 5G लॉन्च करणार अाहे. एलोन मस्कने गूगलशी केलेल्या करारामध्ये स्पेसएक्सच्या वतीने गुगल डेटा सेंटर प्रॉपर्टीजच्या माध्यमातून Starlink ग्राउंड स्टेशनचा शोध घेणार आहे. गूगल क्लाऊडच्या कक्षेत येत्या काही दिवसांत १५०० स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे . यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही अडचणींशिवाय हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये ग्लोबल ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने एक सुरक्षित कनेक्शन पायाभूत सुविधा तयार केली गेली आहे. स्टारलिंक प्रकल्प उपग्रह आधारित इंटरनेट प्रदाता कंपनी आहे. त्याच्या मदतीने, स्टारलिंक जगातील कोणत्याही भागात हाय-स्पीड इंटरनेट सेवा वितरित करण्यात सक्षम आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सध्या स्टारलिंकचे जगभरात १०,००० हून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *