Sat. Oct 16th, 2021

Gmail, Google Mapsच्या यूजर्सला फटका; Googleच्या सेवेत तांत्रिक अडचणी

गुगल कंपनीच्या युजर्सना आज म्हणजेच बुधवार सकाळपासून गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचणी येत आहेत.

Google Drive, Gmail आणि Google Maps या सेवांवर परिणाम झाल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.

Gmailसंदर्भातील समस्या सोडवणाऱ्या पाश्चिमात्य देशांमधील अनेक वेबसाईट्सवर युझर्सने मागील काही तासांपासून गुगलच्या सेवा वापरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.

अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर #GoogleDown हा हॅशटॅग वापरून याबाबतची माहिती दिली आहे.

गुगलने आपल्या सर्व्हिस वेबसाईटवर दिलेल्या एका परिपत्रकामध्ये आम्ही जीमेल वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींसंदर्भातील समस्यांचा तपास करत असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात Gmailच्या युजर्सला लवकरच सविस्तर महिती दिली जाईल असेही कंपनीने म्हटले आहे.

गुगलचे अकाऊण्ट लॉगइन करता येत असले तरी मेसेज पाठवताना Error येणे, Mail पोहचण्यास वेळ लागणे, Mail उघडण्यास वेळ लागणे तसेच अकाऊण्ट रिफ्रेश होण्यास वेळ लागण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

अमेरिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेकांनी गुगल सेवांसंदर्भात तक्रार केली आहे.

या गोंधळामागील कारण अद्याप गुगलने स्पष्ट केलेले नाही. तसेच ही अडचण किती काळ राहणार आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *