Wed. Apr 14th, 2021

Google चं ‘हे’ नवं फिचर वापरून स्वतःच तयार करा मनासारखे emoji

चॅटिंगदरम्यान वारली जाणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोजी (Emoji). वेगवेगळ्या emojis वापरून गप्पा शब्द न लिहिताही रंगतदार करण्ची पद्धत सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. हसण्याची, चिडण्याची, रडण्याची अगदी हरतऱ्हेची इमोजीच चॅटिंगदरम्यान वापरली जातात. आता गुगलने त्यात आणखी सुधारणा करत नवं फीचर आणलं आहे. या फिचरचं वैशिष्ट्य काय आहे जाणून घ्या…

आता स्वतःच तयार करा Emojis   

स्मार्टफोनवर मेसेज टाईप करताना इमोजी वापरले जातात. विविध प्रकारचे इमोजी नेमकी भावना व्यक्त करताना उपयोगी पडतात. मात्र आता आणखी वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी Google ने युजर्ससाठी नवं feature आणलं आहे.

या आगळ्या वेगळ्या फिचरमुळे युजरला स्वतःच Emoji तयार करता येणार आहे.

G-Board वर चालणाऱ्या या फिचरला Emoji Kitchen असं नाव देण्यात आलं आहे.

हे app वापरायचं असेल, तर G-Board अपडेट करावं लागेल.

या इमोजी किचनमध्ये तुम्ही आपल्या आवडीचे इमोजी कस्टमाईज्ड करू शकतात.

दोन वेगवेगळे इमोजी एकत्र मर्ज करून नवा इमोजी तयार करता येऊ शकतो.

स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाला बहुतांश वेळेस, मेसेज करताना इमोजीचा वापर करायला फार आवडते. त्यामुळे गुगलचे हे फिचर युजर्सच्या पसंतीस उतरणार असल्याचे दिसत आहे. या इमोजी किचनद्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे इमोजी कस्टमाइज करू शकता, यामुळे युजरला त्याच्या आवडीने इमोजी मर्ज करून नवीन इमोजी बनवता येणार आहे. हे App वापरण्यासाठी युजर्सना गुगल जीबोर्ड अपडेट कराव लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *