आर्यन ड्रग्जप्रकरणी कोट्यवधींची डील असल्याचा गोसावीच्या बॉडीगार्डचा दावा

क्रूझवरील अंमली पदार्थप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत आहे. तर किरण गोसावी यांनी आर्यनखानसोबत सेल्फी काढल्याने ते चर्चेत आले. आर्यन खान ड्रग्जप्रकरणी डील झाल्याचा दावा किरण गोसावीचे खासगी बॉडीगार्ड प्रभाकर साईलने केला आहे. एका व्हिडीओद्वारे बॉडीगार्डने ही माहिती दिली आहे
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांनी मिळून सर्वांना कसे पकडले याबाबत प्रभाकर साईलने माहिती दिली आहे. क्रूझवरील ड्रग्जपार्टी प्रकरणात किरण गोसावी सुरुवातीपासूनच समीर वानखेडेसोबत होते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानल क्रूझवरून अटक करून एनसीबी कार्यालयात नेले. याप्रकरणाबाबत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा तसेच याप्रकरणी कोट्यवधींची डील केल्याचा दावा किरण गोसावीचे खासगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी केला आहे.
व्हिडिओ सामायिक करत प्रभाकर साईलने हा दावा केला आहे. प्रभाकर साईल म्हलाला की, ‘पत्नीला पोलिसांचे चौकशीसाठी फोन आले होते. त्यामुळे समीर वानखेडेंची आपल्याला भीती वाटते. माझ्या कुटुंबाला काही झालं तर मी कुणासाठी जगायचे, म्हणून मी हा व्हिडीओ सामायिक करत सर्वांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे.’