Wed. Dec 1st, 2021

31 तासानंतर पुण्यातील मूकबधिर तरुणांचे आंदोलन मागे

पुण्यातल्या समाजकल्याण आयुक्तालयावर मूकबधिर तरुणांचे आपल्या विविध मागण्यांसाठी सुरु आंदोलन सुरू होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला होता.

पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये 33 जण जखमी झाले आहेत.

अखेर (26 फेब्रु) 31 तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

यावेळी समाजीक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे.

राज्यसरकारकडून मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन दिल्यांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

मागील 23 तासांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांची भेट घेतली.

आंदोलकांशी चर्चा करून त्यांनी सरकारवर निशाणाही साधला होता.

राज्यसरकारकडून मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन

राज्यसरकारने सभागृहात काही मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन दिलं आहे.

तसेच उर्वरीत मागण्यांबाबत मुख्यमंत्री सोबत बैठकीनंतर पूर्ण करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

काही विशेष मागण्या

मुकबधिरांच्या उच्च शिक्षणासाठी उच्च माध्यमिक विद्यालय पाच विभागात सुरु करण्यात आली.

लातूर नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्या संदर्भात निर्देश देण्यात आले.

सामान्य शासकीय शाळांत सांकेतिक भाषा तज्ञांची नियुक्ती करण्यात येईल.

प्रत्येक जिल्ह्यातील दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधे सांकेतिक भाषा तज्ञांची नियुक्ती करण्यात येईल.

सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाञ ठरवल्या मुकबधिरांच्या वाहन चालक परवाना देण्यात येईल.

शासकीय नोकरीत मूकबधिर प्रवर्गात नियुक्त झालेल्या उमेदवारांची बेरा तपासणी करण्यासंदर्भात आठ दिवसांत परिपञक  देण्यात येईल.

दरम्यान या मागण्या पूर्ण न झाल्यास परत या मूकबधिर मुलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मूकबधिर तरुण 31 तास उपाशी

मूकबधिर तरुणांच्या उपोषणाला 31 तासाचा कालावधी उलटून गेला होता तोपर्यंत ते उपाशीच होते.

पुणे कॅम्प गुरूद्वाराकडून पुलाव, जिलेबी आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या त्यांच्यासाठी आणले होते.

जोवर सरकार निर्णय घेत नाही. तोवर आम्ही जेवण करणार नाही. अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यानी पुणे कॅम्प गुरूद्वाराच्या स्वयंसेवकाकडे मांडली.

त्यानंतर काही वेळाने सरकारने मूकबधिर तरुणाच्या मागण्या मान्य केल्यानंतर पुलाव, जिलेबी आणि पाण्याची बॉटलचे वाटप करण्यात आले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *