सरकारी कर्मचारी केंद्राच्या रडारवर
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
कामचुकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचं आता खरं नाही असं दिसून येत आहे. कारण अधिकाऱ्यांसह 67 हजार कर्मचाऱ्यांच्या कामावर केंद्रीय कार्मिक मंत्रालयाची नजर असणार आहे. या सगळ्यांच्या कामाचा आढावा घेतला जात असून अकार्यक्षम कर्मचारी सरकारच्या रडारवर येणार आहेत.
सरकारी यंत्रणेकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवाचा दर्जा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. यामध्ये आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.