परदेशातून आलेल्या प्रवाशांना सरकारची मार्गदर्शक तत्वे

कोरोना काळात सर्वत्र टाळेबंदी असून देशातील विमानसेवादेखील बंद करण्यात आली होती. तसेच परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन राहणे अनिवार्य होते. मात्र, आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात दाखल झाल्यानंतर क्वारंटाईन राहण्याची आवश्यकता भासणार नाही. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारकडू नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सरकारकडून सादर करण्यात आलेली नवी मार्गदर्शक तत्वे आजपासून लागू करण्यात आली आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना मात्र कोरोना लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य असणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवशांनी कोरोना लस घेतली नसेल किंवा लसीचा केवळ एकच डोस घेतला असेल तर त्या प्रवाशांना भारतीय विमानतळावर कोरोना चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. या चाचणीत निकाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना विमानतळावर जाण्याची परवानगी मिळेल. तसेच या प्रवाशांना सात दिवस होम क्वारटाईन राहणे बंधनकारक असेल.
भारतात आल्यानंतर प्रवाशांना सात दिवसांनंतर कोरोना चाचणी करावी लागेल. प्रवाशांचा केवळ आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट ग्राह्य धरला जाईल. अँटिजेनसारखे इतर चाचण्या मान्य करण्यात येणार नाहीत. भारताने करार केलेल्या डब्ल्यूएचओ मान्यताप्राप्त कोविड लसीसंदर्भातील देशातील प्रवाशांनाच हे मार्गदर्शक तत्वे लागू होणार आहेत.