‘देवाच्या भरवशावर सरकार चाललंय’

जालन्यामध्ये आज भाजपाने जलआक्रोश आंदोलन केले आहे. या आंदोलनात भाजपाचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा देखील सहभाग होता. या आंदोलना दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली आहे. मुख्यमंत्री सरकार चालवत नाही कार चालवात. देशाच्या भरवशावर सरकार चाललं आहे. अशी टिकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
जल आक्रोश मोर्चाची सांगती देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने केली झाली आहे. त्या भाषणार देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. या टिकेत ते म्हणाले आहेत सरकारे पाणी दिले नाही, पण देवाने सभेवेळी पाऊस पाडला. वरूणराजाला माझ्या बंधु- भगिनी सकाळ पासून उन्हात बसल्या आहेत म्हणून पाऊस बरसरला आणि थोडा का होईना त्यांना दिलासा मिळाला आहे. जालन्यातील पाणी योजन अडीच वर्षात थोडीही पुढे गेली नाही. पाणीप्रश्नासाठी सरकार थोडेही गंभारी नाही. या सरकारने जल आक्रोशाची दखल घ्यावी. कारण सरकारला जाग आणण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे.
जनतेने तुम्हाला मिरवण्यासाठी सिंहासनावर बसवलेलं नाही. समस्या सुटणार नसतील तर सिंहासन सोडा असे फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान केले आहे. सुरू असलेली कामे सरकारने अडीच वर्षात बंद केली.’मराठवाडा ग्रीडची सरकारने हत्या केली आहे.’ हे सरकार पाण्याचे शत्रू आहेत. त्यांनी जनतेच्या समस्येचं देणं-घेणं नाही. भाजपा सरकार गेलं आणि सर्व योजना ठप्प झाल्या आहेत. मविआ सरकार योजनांना फक्त स्थगिती दिली आहे. अशी टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.