Mon. Jul 26th, 2021

खा. संभाजीराजे यांच्या मोफत शिक्षणाच्या मागणीबद्दल सरकार सकारात्मक- चंद्रकांत पाटील

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 12 वी पर्यंत मोफत शिक्षणाच्या केलेल्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 12 वी पर्यंत मोफत शिक्षणाच्या केलेल्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

सध्या मुलींना 12 वी पर्यंत मोफत शिक्षण आहे तर खाजगी शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश शासकीय कोट्यातून राखीव ठेवले आहेत.

सरकारने मेडिकल आणि इंजनियरिंगमध्ये जी सवलत दिलीय तीच सवलत देता येते का याबाबत सुद्धा सरकार सकारात्मक आहे.

मुख्यमंत्री आणि संभाजीराजे हे चर्चा करून आणखी काही देता येते का याचा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

संभाजीराजेंच्या मागणीनंतर गिरीश महाजन यांनी मोफत शिक्षण शक्य नसल्याचं म्हटलं होतं. मात्र चंद्रकांत पाटील आज सकारात्मक भूमिका दर्शवलीय.

त्यामुळे या दोन भूमिकांची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.

 

‘आरक्षण गेलं खड्ड्यात! शिक्षण मोफत करा!’, छत्रपती संभाजी महाराजांचं Tweet!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *