Wed. Nov 13th, 2019

10 वी पास उमेदवारांनो, तुम्हाला राष्ट्रसुरक्षेसाठी नोकरीची संधी!

देशाच्या सुरक्षेसाठी काम करायचं आहे पण संधी मिळत नाहीये? नोकरी करायचीये, शिक्षण कमी पडतंय? मात्र 10 पास शिक्षण असूनही  सरकारी नोकरी मिळण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. या नोकरीत देशसेवचीही सुवर्णसंधी आहे. BRO मध्ये ही नोकर भर्ती सुरू आहे. तुम्ही 10 वी पास असलात, तरीही तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.

कुठे मिळेल नोकरी ?

तुम्ही दहावी पास असाल तसंच तुमच्याकडे ITI चं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ही सरकारी नोकरी मिळवू शकता.

‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ म्हणजे BRO मध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

सुरक्षा मंत्रालया अंतर्गत असणारी BRO ही संस्था सीमारेषेजवळ पायाभूत सुविधा उभारण्याचं काम करते

या BRO मध्ये 778 जागा भरण्यात येणार आहेत.

कोणकोणत्या पदासाठी आहे भरती ?  

एकूण जागा – 778

ड्रायव्हर  – 388 जागा

मोटर मॅकेनिक – 92 जागा

इलेक्ट्रिशियन – 101 जागा

मल्टि स्किल्ड वर्कर – 197 जागा

पात्रता 

10 वी पास असणं गरजेचं आहे.

ITI सर्टीफिकेट असणं गरजेचं आहे.

वाहनचालक परवानाही असणं आवश्यक आहे.

18 ते 27 वर्षांचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.

अर्जासाठी तारखा कोणत्या ?

या जागांसाठी 1 जून 2019 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

15 जुलै 2019 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

मात्र ईशान्य भारतातील (आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणीपूर, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम) उमेदवारांसाठी तसंच जम्मू-काश्मीर, लडाख , लाहौल आणि स्पीती व्हॅली, चंबा, पांगी आणि अंदमान निकोबार, लक्षद्वीपमधील उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 30 जुलै 2019 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

यासंदर्भात आणखी माहिती  http://www.bro.gov.in/ वर सविस्तर माहिती  तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळेल.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *