Thu. May 19th, 2022

‘महाराष्ट्रात ‘गब्बर’सारखा कारभार सुरू’ – आशिष शेलार

नागरिक, संपादक काही बोलले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केली जातात. आमदारांनी प्रश्न उपस्थितीत केले तर त्यांना निलंबित करण्यात येते. मंत्रीच महिलांवर अत्याचार करतात, पोलिसांना वसुली करायला लावली जाते, त्यामुळे महाराष्ट्रात गब्बर चे राज्य आहे का? असा सवाल भाजप नेते ऍड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

वरळीमधील अग्नीतांडवाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या घटनेवर आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. अशी दुर्घटना घडल्यानंतर पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना उपचारांसाठी जात असेल तर ते सुरक्षित नाही. महापौर किशोरी पेडणेकर ७२ तासांनी रुग्णालयात पोहचल्या. त्यामुळे ७२ तास त्या कुठे होत्या? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनवर दिवसाला दीड लाख रुपये खर्च होतात. परंतु बाळाला वाचवण्यासाठी ४५ मिनिटांत पोहोचणार नाही, अशा हलगर्जीपणाविरोधात आम्ही आवाज उठवणार असल्याचा इशारा आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

आशिष शेलार यांनी पर्यटनमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे. युवराजांचे हेलिकॉप्टर जमिनीवर उतरच नाही, अशी टीका आशिष शेलारांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे, तसेच भाजप नगरसेवकांना हात लावाल तर खबरदार असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.