Thu. Jul 9th, 2020

‘राम सिया के लव कुश’ मालिकेला केंद्रीय प्रसारण मंत्रालयाची नोटीस!

पौराणिक मालिकांचा वाढता प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊन सध्या अनेक वेगवेगळ्या पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागल्या आहेत. मात्र कलर्स हिंदी वाहिनीवर सुरू असलेली ‘राम सिया के लव-कुश’ ही मालिका मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता यांचे पुत्र लव कुश यांच्यावर ही मालिका आधारित आहे. उत्तर रामायणावर आधारित या मालिकेमध्ये मनोरंजनासाठी अनेक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप होतोय. केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने या प्रकरणी कलर्स वाहिनीला नोटीसही बजावली आहे.

‘राम सिया के लव-कुश’ मालिकेत महर्षी वाल्मिकी यांचं पात्र चुकीच्या पद्धतीने चित्रित केल्याचा दावा वाल्मिकी समाजाकडून होतोय.

या मालिकेचं प्रसारणच त्यामुळे बंद करून टाकावं, अशी मागणी पंजाबमधील वाल्मिकी समाजाने केली आहे.

त्यांनी या विरोधात निषेध मोर्चाही काढला.

तसंच फाजिल्का शहरात दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं.

त्यानंतर पंजाबच्या काही भागांमध्ये या मालिकेचं प्रारण बंद ठेवण्यात आलं.

आपल्या समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप वाल्मिकी समाजाने केलाय.

मात्र या मालिकेवर बंदी घालता येणार नाही, असा निर्वाळा पंजाब हरयाणा हायकोर्टाने दिलाय.

त्यामुळे या मालिकेवर बंदी घालण्यात येणार नाही. मात्र मालिकेत तथ्यांची मोडतोड केल्याच्या आरोपांमुळे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने कलर्स वाहिनीला नोटिस बजावली आहे. येत्या 15 दिवसांत आपली बाजू मांडण्यासाठी मंत्रालयात हजर राहाण्याचेही आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *