Wed. Jan 19th, 2022

बंद काळात सेस निधी रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी वापरावा- देवेंद्र फडणवीस

कोरोना व्हायरसचं संकट जगावर पसरलं असताना महाराष्ट्रात उद्धव ठाकरे योग्य पद्धतीने जबाबदारी पेलत आहेत, की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं सारथ्य करण्याची गरज होती, यावर राजकीय वाद रंगला आहे. अशावेळी खुद्द माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

केंद्र सरकारने तसंच राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं जनतेने पालन करावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्याचवेळी त्यांनी राज्य सरकारला काही सूचना दिल्या आहेत. सर्वत्र महानगरं बंद ठेवणं जरी गरजेच  असलं, तरी ज्या लोकांचं पोट रोजंदारीवर अवलंबून आहे, त्यांच्यासदर्भात सरकारला उपाययोजना करणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं. मुंबई आणि MMR क्षेत्रात सुमारे ५० लाख बांधकाम मजूर काम करत आहेत. या मजुरांसाठीचा सेस सरकारकडे आहे. यात ४००० कोटी रुपये निधी आहे. त्याचा वापर केल्यास या मजुरांच्या भत्त्याची व्यवस्था सरकार करू शकतं, अशी सूचना फडणवीस यांनी दिली आहे. रोजगारावर आलेलं संकट मोठं असून त्यावर सरकारने ठोस पाऊलं उचलणं गरजेचं आहे.

याशिवाय रेल्वे स्टेशन्सवर थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था वाढवण्यात यावी, असी मागणी फडणवीस यांनी केली आहे. कारण अजूनही रेल्वे स्थानकांवर अजूनही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या गर्दीत संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना होण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *