राज्यपालांनी घेतला रायगड जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या रायगड जिलह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी भेट दिली.

तसेच जिल्ह्यातील अनेक विकासकामांचा आढावा घेतला.

राज्यपालांनी आज अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला.

यात प्रामुख्याने रायगड किल्ला संवर्धन, रो रो सेवा, कर्जमुक्ती, अतिवृष्टी, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, समग्रशिक्षा, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अशा योजनांचा समावेश आहे.

कारागृहातील कैद्यांना सौरदिवे दुरुस्ती प्रशिक्षण देऊन जिल्ह्यातील दुरुस्तीचे काम त्यांना देण्यात आले आहे.

याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. राज्यपालांनी यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. जिल्ह्यातील कामांचे पॉवर पॉईंटद्वारे प्रदर्शन ( प्रेझेंटेशन ) करण्यात आले.

या बैठकीला पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान राज्यपालांनी काल रविवारी ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट दिली.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे देखील त्यांनी दर्शन घेतले.

राज्यपालांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धन व परिरक्षण कामाची पाहणी केली.

Exit mobile version