Sat. Oct 16th, 2021

पानसरे हत्या प्रकरणी अटकेत असलेल्यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ

पानसरे हत्या प्रकरणी ताब्यात असलेल्या सचिन अंदुरे,गणेश मिस्किन आणि अमित बद्दी यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आलीय.

पानसरे हत्या प्रकरणी ताब्यात असलेल्या सचिन अंदुरे,गणेश मिस्किन आणि अमित बद्दी यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आलीय. सुनावणीवेळी दरम्यान सचिन अंदुरे याने गुन्हा कबुल करण्यासाठी तपास अधिकारी अमृत देशमुख यांनी 50 लाखाची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

शिवाय बंदूकधारी पोलीस घेऊन दबाव टाकून चौकशी होत असल्याचा आरोपही त्याने केला.याची नोंद आज न्यायालयाने घेतली. दरम्यान आजच्या सुनावणीत संशयित आरोपींनी पानसरे यांच्या कार्यालय परिसरात रेकी केल्याची कबुली केली आहे.

कोल्हापूरपासून दोन तासावरील जंगलात एअर पिस्टलचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आणखी तिघे आरोपी यामध्ये सहभागी असल्याची माहिती पुढे येत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला त्यावर हा केवळ बनाव असल्याच सांगत सरकारी वकिलांचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी खोडून काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *