Sun. Oct 24th, 2021

दहशतवादी कारवायांमुळे अमरनाथ यात्रेला केंद्राची स्थगिती

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरुंग आणि स्निपर रायफल सापडली असल्याची माहिती यावेळी भारतीय लष्कराने दिली आहे. यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरुंग आणि स्निपर रायफल सापडली असल्याची माहिती यावेळी भारतीय लष्कराने दिली आहे. यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थीती बघता गृह खात्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभमीवर अमरनाथ यात्रेकरुंना परत बोलावण्यात आलं आहे. य़ा भागात भुसुरूंग सापडले असून अजूनही शोध मोहिम सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये जवानांची संख्याही वाढवण्यात आली आहे,

अमरनाथ यात्रेला टार्गेट करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न

पाकिस्तानी लष्कराचं समर्थन असणारे दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती.

या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने शोध मोहिम सुरू केली असता शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

या शोधमोहिमेमध्ये एक भुसुरुंग सापडला आहे तर एम-२४ अमेरिकन स्निपर रायफल सापडली असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

हा भुसुरुंग पाकिस्तानातील फॅक्टरीत तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच काही बॉम्बही सापडले आहेत.

या पार्श्वभुमीवर यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. अमरनाथ यात्रेकरुंना परत बोलावण्यात आलं आहे.

या भागात अजूनही शोध मोहीम सुरू असून जम्मू काश्मीरमध्ये जवानांची संख्याही वाढवण्यात आली आहे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *