सीबीएसई बोर्ड परीक्षावर फेरविचार करण्याबाबत राहुल गांधी यांनी केली विनंती; राहुल गांधींचे टि्वट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट करून केंद्र सरकारला सीबीएसई बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत फेरविचार करण्याची विनंती केली असून त्यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग, लसीचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्नांवरून केंद्रावर टीका केली आहे.
देशात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. सरकारला यावर नियंत्रण मिळवता आले नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. तसेच सीबीएसई बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत फेरविचार करायला हवा, असेही देखील त्यांनी टि्वटद्वारे म्हटलं. सीबीएसईच्या लेखी परीक्षांना 4 मेपासून सुरुवात होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षावर फेरविचार करण्यात यावा असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

 

कोरोनावर नियंत्रण नाही, लसीचा पुरवठा नाही, रोजगार नाही, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, एमएसएमई सुरक्षित नाही, मध्यमवर्गीय समाधानी नाही, असे राहुल गांधी टि्वटमध्ये म्हणाले. तसेच आंबा खाणे ठिक होते. मात्र, सामान्य नागरिकांना तरी सोडायचे, अशी उपहासात्मक टीका राहुल गांधींनी यांनी केली.

अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची एप्रिल 2019 मध्ये मुलाखत घेतली होती. यावर देखील राहुल गांधी यांनी टीका केली आहे. अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गैर राजकीय प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी या मुलाखतीवर टीका केली तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहून सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर दुसरी लाट पसरली आहे. स्थलांतरीत कामगारांना पुन्हा आपल्या गावाची वाट धरावी लागली आहे. त्यांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे. सामान्य नागरिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे करणे गरजेचे आहे. मात्र, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे, असे खोचक टि्वट त्यांनी केले होते. राहुल गांधींचे मोदींना पत्र गेल्या शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना परिस्थिती आणि लसीचा तुटवडा, याबाबत सवाल केले होते. कोरोना लसीच्या निर्यातीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती. इतर लसींनाही वेगवान मार्गाने मान्यता देण्यात यावी, असे देखील त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. तसेच 11 ते 14 एप्रिल या काळात लसीकरण महोत्सव साजरा करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचा संदर्भ देत, राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली होती. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लसीची कमतरता ही गंभीर समस्या आहे, असं त्यांनी म्हटलं.

Exit mobile version