Thu. Jan 20th, 2022

बुलडाण्यात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये राडा

बुलडाणा जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रिये दरम्यान दोन गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारीत चौघे जखमी झाले आहेत. मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात २ नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या १६६ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. जलंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. त्यावेळी ही हाणामारी झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बीडमध्ये मतदानावरून दोन गटात जुंपली

बीडमध्येही मतदानावरून भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरच या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. बीडमधील वडवणीच्या  केंद्र क्रमांक ३वर या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यावेळ घटनास्थळी पोलिसांकडून या  कार्यकर्त्यांवर सोम्य लाठीचार्ज करण्यात आला. मतदानाच्या सुरूवातीलाच राडा झाल्याने बीडच्या वडवणीत तणाव पाहायला मिळाला. यावेळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला.

भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत समिती निवडणुकी करीता मतदान सुरू असून मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असल्याने याचा परिणाम मतदानावरसुद्धा झालेला पहायला मिळत आहे. तर या निवडणुकीत नाना पटोले, प्रफुल पटेल, परिनय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ही निवडणूक येणाऱ्या विधान परिषद निवडणूकच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *