Fri. Oct 7th, 2022

नवी मुंबईत भव्य कॅट शो

नवी मुंबईत पहिल्यांदाच फिलाईन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने आशियातील सर्वात भव्य कॅट शो चॅम्पियनशिप स्पर्धेसोबतच कॅट दत्तक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे . वाशी येथील सिडको एक्सिबिशन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. मांजरांच्या या भव्य स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय ७० प्रजातीच्या ५०० पेक्षा अधिक मांजरीनी सहभाग घेतला होता. मांजराची प्रजाती, तीच रूप, तिचे वजन, तिचे संपूर्ण शरीर या सर्व गाष्टींचं बारीक निरीक्षण करून या स्पर्धेतील सर्वोत्तम मांजरीची निवड करण्यात येणार आहे.

राज्यभरातील मांजर प्रेमी आपल्या लाडक्या मांजरीला घेऊन या स्पर्धेत सहभागी झाले असून या सर्व स्पर्धकांनी आपला आनंद व्यक्त केल. आंतरराष्ट्रीय प्रजाती समजल्या जाणाऱ्या पर्शियन तसेच बंगाल कॅट प्रजातीच्या मांजरी मोठ्या संख्येने यास्पर्धेत सहभागी झाल्या असुन या मांजरींना पाहण्यासाठी देखील नागरिक मोठी गर्दी करत आहेत.

या विविध प्रजातीच्या मांजरांना पाहून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण भारावून गेले आहेत. यासोबतच याठिकाणी भारतीय प्रजातीच्या मांजरांसाठी दत्तक मोहीम देखील राबविण्यात येत असून नागरिक या मोहिमेला देखील चांगला प्रतिसाद देत आहेत..
एकूणच नेहमी चित्रपटात पहायला मिळणाऱ्या या विविध प्रजातींच्या मांजरी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहताना एक सुखद अनुभव मिळतो ज्यासाठी कॅट लव्हर्स येथे मोठी गर्दी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.