८० वर्षाच्या आजींनी सर केला रांगणा गड
सिंधुदुर्गातील कुडाळ निवजे गावातील या आजी

सिंधुदुर्ग: लक्ष्मी विष्णू पालव या ८० वर्षाच्या आजींनी सिंधुदुर्ग – कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर २२२७ फूट उंच असलेला रांगणा गड सर केलं आहे. आजींची ही सफर तरुणाईला लाजवणारी आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ निवजे गावातील ८० वर्षाच्या आजीनी दोन तासात चढाई केली आहे.
या आजीने न थांबता, न थकता चालत गडावर गेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यामध्ये रांगणा गडाचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याने संपन्न अश्या गडावर ‘शिवाजी महाराज की जय’ म्हणत आजीबाईनी चालायला सुरुवात केली होती. नातवंड आणि पतवंडानी त्यांचा सोबत जाऊन आनंद द्विगुणित केला आहे. आजींची ही सर्वानाच अचंबित करणारी आहे.