Jaimaharashtra news

नाशिककरांसाठी मोठा दिलासा

नाशिक : नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हाकडे पावसाने पाठ फिरवल्याने प्रशासनाला आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. अखेर मंगळवारपासून शहरासह धरण क्षेत्रात देखील संततधार पाऊस सुरू असल्याने हळूहळू का होईना धरणातील पाणीसाठा देखील वाढतो आहे.

Exit mobile version