Fri. Oct 7th, 2022

ग्रेटर नोएडामध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशाच्या ग्रेटर नोएडामधील यमुना एक्सप्रेस वे वर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना जेवरमधील कैलास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

नेमकं काय घडला ?

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील यमुना एक्सप्रेस वे वर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला.

अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर 30 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींवर जेवरमधील कैलास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात बसचा ब्रेक फेल झाला असल्यामुळे घडला असल्याची  प्राथमीक माहिती समोर आली आहे.

पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्याचे समजते आहे.

या अपघाताची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.