Fri. May 7th, 2021

‘या’ गावात 130 वर्षांपासून प्रदूषण रहित दिवाळीचा संकल्प

दिवाळी म्हणजे रोषणाई, उल्हास, उत्सवाचा सण आहे. प्रत्येकजण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तसेच दिवाळीत लहानमुले फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. मात्र या फटाक्यांमुळे वायु प्रदुषणात वाढ होते. या दिवाळीत वायू प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिला आहे की यंदा विक्रीसाठी केवळ हरित फटाक्यांनाच परवानगी दिली जाईल ज्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि फटाक्यांवर बंदी घालण्यात येईल.

आपल्याला वाटते की हरित फटाके ही एक नवीन संकल्पना आहे, मात्र आसाममधील एका गावात 130 वर्षांपासून हरित फटाक्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. या गावामध्ये हरित फटाके फोडूनच दिवाळी साजरा केली जाते. आसाम मधील ‘गणक कुची’ हे गाव एका अद्वितीय फॉर्म्युलासह फटाके तयार करीत आहे. ज्यांमुळे कमी आवाज येतो तसेच हानिकारक रसायने सोडत नाहीत.

“आमची उत्पादने जवळजवळ हरित फटाक्यांसारखीच आहेत. आम्ही उच्च प्रदूषणकारक सामग्री वापरत नाही म्हणून कमी प्रदूषण होत आहे, परंतु आम्हाला तज्ञ आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, ज्यामुळे आमच्यासारख्या स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, “असे पारंपारिक फटाके बनवणाऱ्यांचे म्हणणे आहे.

आसामने या हरित फटाक्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आणि आता हरित फटाके बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया हाताने तयार केली जात आहे परंतु गावात संपूर्ण प्रक्रिया मशीन-आधारित बनविण्याचा प्रयत्न येथील गावकरी करत आहेत.

यासारख्या गावांनी संपूर्ण भारतासाठी एक उदाहरण मांडले आहे तसेच लोकांनी निसर्गाची आणि पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. अशी शिकवणही दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *