Wed. Jun 29th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून धुलिवंदनाच्या शुभेच्छा!

गेली दोन वर्षे कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे सण-उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे सणांवरील निर्बंध हटवण्यात आले असल्यामुळे सण साजरा करताना नागरिकांमध्ये उत्साह दिसत आहे. राज्य सरकारने होळी आणि धुळवडीवरील निर्बंध हटवल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीयांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. परस्पर प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला हा रंगांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाचे सर्व रंग घेऊन येवो.

धुलिवंदनाच्या दिवशी पोलीस बजावताय कर्तव्य

कोणत्याच सणाच्या दिवशी पोलिसांना सुट्टी नसते. आजही धुलीवंदनाच्या दिवशी पोलीस कर्तव्य बजावताय. एकीकडे रंगाची धुळवड उडवत रंगीबेरंगी चेहरे सर्वत्र हसत-खेळत फिरताय तर पोलिस मात्र कर्तव्याचा रंग उडवत सण साजरे करत असतात.यावर्षी कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्याने रंगांच्या सणाचा आनंद द्विगुणित झाला . मुंबई मधील दादर परिसरात पोलिसांनी देखील रंगांचा आनंद लुटला. मुंबई पोलीस बँड पथकाकडून मुंबईकरांना होळीच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. पुष्पा सिनेमातील श्री वल्ली गाण्यानंतर मुंबईकरांना रंग बरसे गाणं वाजवून होळीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.