Thu. Sep 16th, 2021

लोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणा-या लोकमान्य टिळकांना रांगोळीतून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने १०१ दीप प्रज्वलित करुन त्यांच्या कार्याचे स्मरण देखील उपस्थितांनी केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट, न-हेतर्फे लोकमान्य टिळक यांच्या १०१ व्या पुण्यतिथीनिमित्त रांगोळी साकारण्यात आली. टिळकांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगणारी ही रांगोळी २० बाय २० फूट आकारामध्ये साकारण्यात आली. रांगोळीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी चार तासांमध्ये ही रांगोळी साकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *