जम्मू-काश्मीरमध्ये CRPFच्या पथकावर ग्रेनेड हल्ला; 1 जवान जखमी

सध्या देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असताना जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलावर दहशतवादी हल्ला होत आहे. सोपोरमधील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेजवळ आणि सोपोरमधील वारपोरा येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. सोपोरमधील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला. तसेच वारपोरा येेथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

नेमकं काय घडलं ?

जम्मू- काश्मीरच्या सोपोरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला.

सोपोरमधील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेजवळ आणि सोपोरच्या वारपोरा येथे दहशतवादी हल्ला घडला.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला.

तसेच या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

तसेच सोपोरच्या वारपोरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली.

या परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

 

 

Exit mobile version