Tue. Sep 17th, 2019

त्याच्या लग्नात घुसली त्याची ‘गर्लफ्रेंड’ आणि…

0Shares

विवाहसोहळा सुरू असतानाच अचानक पहिली पत्नी किंवा गर्लफ्रेंड पोलिसांना घेऊन येते, आणि विवाह होऊ देत नाही, अशा प्रकारच्या घटना तुम्ही सिनेमा, सिरीयल्समध्ये पाहिल्या असतील, किंवा बातम्यांमध्ये पाहिल्याही असतील. छत्तीसगढमध्ये मात्र अशा प्रकारच्या घटनेत एक वेगळाच ट्विस्ट आलाय.

2 वर्षांपासून प्रेमप्रकरण!

बिरबल नाग या युवकाचं सुमनी नामक तरुणीवर प्रेम होतं.

मात्र या प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता.

त्यामुळे ही प्रेमकहाणी पूर्ण होऊ शकत नव्हती.

2 वर्षं वाट पाहिल्यावर अखेर बीरबल नाग दुसऱ्या मुलीशी विवाह करण्यास तयार झाला.

छत्तीसगढच्या दंतेवाडा या भागातील मुचनार येथे बीरबलचा प्रतिभा या मुलीशी विवाहविधी पार पडत होता.

मात्र बीरबलच्या लग्नाची माहिती मिळताच सुमनी तेथे येऊन पोहोचली.

 

बीरबलची ‘चतुराई’!

बीरबल आणि आपलं प्रेम असल्यामुळे त्याने आपल्याशीच विवाह करावा, असा हेका तिने धरला.

शेवटी सर्व वरात पोलीस स्टेशनला पोहोचली.

मात्र पोलिसांसमोर अतिशय सामोचाराने बोलणी झाली.

कोणत्याही प्रकारचा राडा, भांडण असा प्रकार झाला नाही.

बीरबल आणि सुमनीचं तर प्रेम होतंच. पण आता प्रतिभाचं काय होणार असा प्रश्न होता.

मात्र यावेळी बीरबलने चतुराईने निर्णय घेत दोन्ही मुलींशी विवाह करायची तयारी दर्शवली.

या निर्णयाला सुमनीनेही विरोध केला नाही आणि प्रतिभाही यासाठी तयार झाली.

कुटुंबिय आणि समाजबांधवांनीही याला विरोध केला नाही आणि सर्वांच्या संमतीने त्याने दोघींशी विवाह केला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *