Sat. May 15th, 2021

Tik Tok व्हिडीओ पाहत असलेल्या तरुणावर गोळीबार

पिंपरी चिंचवडमध्ये दोन तरुणांनी मिळून एका महाविद्यालयीन तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे या गोळीबारात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे समजते आहे. हा हल्ला Tik Tokवर व्हिडीओ बघत असलेल्या तरुणावर केला. चैतन्य कदम आणि रोशन सोळंकी असे या दोन्ही आरोपींचे नाव आहे. तसेच ज्याच्यावर हल्ला करण्यात आला तो 16 वर्षाचा आहे.

नेमकं काय घडलं ?

पिंपरी चिंचवडमध्ये 16 वर्षीय तरुण Tik Tokवर व्हिडीओ बघत असताना त्याच्या दोन जणांनी मिळून गोळीबार केला.

शुक्रवारी संध्याकाळी जुनी सांगवी येथील गंगोत्री निवासस्थानी येथे महाविद्यालयीन तरुण Wifi वर व्हिडीओ बघत होता.

यावेळी रोशन आणि चैतन्य दुचाकीवरून आले असताना पाठीमागून त्यांनी तरुणावर गोळीबार केला.

रोशनने महाविद्यालयीन तरुणावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या.

मात्र गोळी कोणालाच लागली नसल्यामुळे तरुणाचा थोडक्यात जीव बचावला.

तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

या तरुणावर गोळीबार करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *