Wed. Jun 16th, 2021

गुंगीचं बिस्कीट देऊन प्रवाशाला लुटणाऱ्या ‘बंटी-बबली’ला अटक

प्रवाशाला गुंगीचं औषध मिसळलेलं बिस्कीट खायला देऊन लुटणाऱ्या या ‘बंटी बबली’ जोडीला कल्याण GRP क्राईम ब्रँचने अटक केलीये. सरला चंदनशिवे आणि नदीम सय्यद अशी या आरोपींची नावं आहेत.  त्यांच्याकडून प्रवाशाकडून लुटलेला सव्वा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय.

डोंबिवलीतल्या तरुणाला अशा प्रकारे लुटलं!

परशुराम पवार असं लुटण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो डोंबिवलीत राहणारा आहे.

भिवंडीला नोकरी करणारा परशुराम हा 17 एप्रिल रोजी कल्याणच्या प्लॅटफॉर्म 1 वर बसला होता.

त्यावेळी एक तरुणी त्याच्याकडे आली आणि ओळख काढून गप्पा मारू लागली.

त्यानंतर मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटायला बोलावलं.

दुसऱ्या दिवशी या तरुणीने परशुरामला बिस्कीट खायला दिलं.

या बिस्किटामध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं.

या औषधाचा परिणाम झाल्यावर गुंगी आलेल्या परशुराम याला तिने कोपर रेल्वे स्टेशनला नेलं.

तिथे दुसऱ्या एका सहकाऱ्याच्या मदतीने परशुरामला लुटून दोघे पसार झाले.

इतक्यावरच न थांबता या दोघांनी मुंब्रा इथून परशुरामचं एटीएम कार्ड स्वाईप करून मोबाईल, टीव्ही आणि दागिन्यांची खरेदी केली.

बंटी-बबलीची झटपट पैशांसाठी लूटमार!

याबाबत परशुरामने तक्रार केल्यानंतर कल्याण जीआरपी क्राईम ब्रँचने सीसीटीव्हीच्या आधारे तपस करत या बंटी बबलीला अटक केली. त्यांची नावं सरला चंदनशिवे आणि नदीम सय्यद अशी असून हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं समोर आलंय. झटपट पैसे कमावण्यासाठी त्यांनी हा लुटमारीचा धंदा सुरू केल्याची कबुली दिली असून यामुळे त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *