Wed. Dec 8th, 2021

खूशखबर! घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, ‘GST’त 7 टक्के कपात

स्वत:चे घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रविवारी आनंदाची बातमी दिली आहे.

बांधकाम पूर्ण न झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांवरील तसेच परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत बसणाऱ्या घरांवरील वस्तू आणि सेवाकरात प्रत्येकी 7 टक्क्यांची घसघशीत कपात करण्याचा निर्णय ‘GST’ परिषदेने घेतला आहे.

यामुळे एकीकडे घरं स्वस्त होतील तर दुसरीकडे मंदीने ग्रासलेल्या बांधकाम व रियल इस्टेट उद्योगात तेजी येऊन रोजगार वाढतील व एकूणच अर्थव्यवस्थेस उभारी येईल, अशी अपेक्षा आहे.

‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीनंतर परिषदेचे अध्यक्ष व केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हे निर्णय जाहीर केले.

त्यानुसार अर्धवट बांधकाम झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांवर सध्या लागू असलेला 12 टक्के ‘जीएसटी’ कमी करून 5 टक्के करण्याचे ठरविण्यात आले आहे.

मात्र ही कर आकारणी ‘इनपुट क्रेडिट’ विचारात न घेता केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बांधकाम क्षेत्राला आणखी चालना देण्यासाठी तसेच मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्ग तसेच मध्यमवर्गात जाण्याची आकांक्षा असलेल्या गरीब घटकांतील लोकांना दिलासा मिळावा म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचा आगामी निवडणुकीशा काही संबंध नाही, असा दावाही अरुण जेटली यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *