जीएसटीबाबत महत्त्वाची बातमी
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
देशात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST लागू करण्याच्या दृष्टीने केंद्रसरकारने निर्णायक पाऊल पुढे टाकलं. श्रीनगरमध्ये सुरु असलेल्या बैठकीत GSTच्या सात नियमांवर शिक्कामोर्तब झालं.
यामध्ये 1211 वस्तू आणि सेवांसाठी कराची मर्यादा ठरवण्यात आली आहे. आधी चर्चा होती त्याप्रमाणे GSTचे चार विविध दर आहेत. 5%, 8%, 18% आणि 28% असे करांचे दर आहेत. कोणत्या वस्तू किंवा सेवा यातल्या कुठल्या मर्यादेत बसणार हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.