Thu. Jan 27th, 2022

राज्यभरात सर्वत्र गुढी पाडव्याचा उत्साह

साडेतीन मुहर्तांपैकी एक असाणाऱ्या गुढी पाडव्यानिमीत्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. पारंपारिक वेशभूषा, पारंपारिक नृत्य तसेच ढोलताशांच्या गजरात सर्वत्र  नवीन वर्षाचं स्वागत होत आहे.ठिकठिकाणी शोभायात्रा सुरू असून यामध्ये महीलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.संपूर्ण महाराष्ट्रात  अनेक संदेश देत अनोख्या पद्धतीने हा सण साजरा केला जात आहे.

राज्यभरात सर्वत्र गुढी पाडव्याचा उत्साह:

गुडीपाडव्याच्या निमित्ताने नागपूर मध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला आहे.

नागपूरमधील  विध्यार्थी देखील यात सहभागी झाले  होते.

गुलाब पुष्प देऊन पेढा भरवीत नागरिकांच्या स्वागतासाठी शहरातील विविध भागात कमानी देखील उभारण्यात आल्या आहे.

 

हिंगोलीत गुढीपाडवा व नववर्षाच्या स्वागतासाठी हिंगोली शहरात आज सकाळी गुढीपाडव्याच्या शोभा यात्रेला सुरुवात झाली.

ढोल-ताशांच्या गजरात व पारंपारिक वेशभूषेत महिलेच्या डोक्यावर कळस मुलीच्या हातात गुढी

हातात भगवा पताका या शोभायात्रेला महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वारकरी संप्रदायातील देखील काही भक्तगण यामध्ये सहभागी झाले होते.

हिंगोली शहरातील देवडा नगर,शिवाजी नगर,शास्ञी नगर मुख्य बाजार पेठेतुन रँली काढण्यात आली .

श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचे अनुयायी यांच्याकडून या शोभा यात्रेच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

दादरच्या शोभा यात्रेतून गुढीपाडव्यानिमीत्त महाराष्ट्राची परंपरा डोळ्यासमोर आली.

महाराष्ट्रातील विविध लोकनृत्य दाखवण्याचा प्रयत्न या शोभायात्रेत  विशेष म्हणजे आदिवासी तारफा नृत्य सादर करण्यात आले.

 

कल्याण डोंबीवली गुडीपाडव्याच्या शोभायात्रेत कल्याण डोंबिवली रनर पथक सहभागी झालंय.

आरोग्याच्या दृष्टीनं धावण्याचं महत्व ते या शोभायात्रेतून पटवून देतायेत.डोंबीवलीच्या शोभायात्रेत समर्पण मेडीटेशन ग्रुप सहभीगी झाला आहे

गिरगावच्या  सकाळीचं जोरदार शोभायात्रेला सुरुवात झाली.

शोभायात्रेतल्या ध्वजपथकांच्या वाद्यांनी शोभायात्रेची शान वाढवली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त पुण्यात भव्य शोभा यात्रेला सुरुवात झाली.हजारो पुणेकर या शोभा यात्रेला पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेत.

 

ढोल-ताशा वाजवत सामाजिक संदेश देणारे फलक यामध्ये दिसत आहेत.तरुणींची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.वेगवेगळ्या प्रकारचे रथ या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत मतदान करण्याविषयी जनजागृती देखील या माध्यमातून करण्यात येत आहेत.

ठाण्यात पारंपारिक, मराठमोळ्या वेशभुषेत महिला बाईक वरून स्वागत यात्रेतून

वेगवेगळ्या सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.

यामधून नवी पिढी सुद्धा मोठ्या उत्साहात सामील होताना दिसत आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *