Tue. Jun 18th, 2019

डोंबिवलीत शोभायात्रेने नव वर्षाचे दिमाखदार स्वागत

29Shares
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा आणी मराठी नव वर्षाची सुरवात या सणाने होत्या. अशा गुढीपाडव्याच्या मंगल सणाचे स्वागत डोंबिवलीत शोभायात्रेने उत्साहात करण्यात आला आहे.डोंबिवलीची शोभायात्रा अतिशय उत्साहात संपन्न झाली. या शोभायात्रेत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. दरवर्षी ही शोभायात्रा पाहण्यासाठी डोंबिवलीत मोठी गर्दी असते.साहसी खेळ प्रात्याक्षिक, जलदिंडी ,शोभायात्रेत मॅचिंग साड्यांची थीम,गडकिल्यावरच्या शिल्पचित्रांचं प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांनी ही शोभायात्रा संपन्न झाली.

डोंबिवलीत शोभायात्रा उत्साहात

लेझीम पथक

डोंबिवलीची शोभायात्रा अतिशय उत्साहात संपन्न झाली. लेझीम पथक यात्रेच्या सुरुवातीला  जोशाने लेझीम खेळत होतं.  तोच जोश शेवटपर्यत दिसून आला.

साहसी खेळ प्रात्याक्षिक

डोंबिवलीतल्या शोभायात्रेमध्ये नासिक खेळांची प्रात्यक्षिके करणारी एक टीम आलेली होती गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक वर्षांपासून डोंबिवलीतल्या तरुण , तरुणींना या साहसी खेळाचे धडे दिले जात आहेत.

विविधतेत एकता

भारत म्हणजे सर्वधर्म संस्कृतींचा मिलाफ आहे असं म्हटलं जातं मात्र खऱ्या अर्थाने हा मिलाफ डोंबिवलीतल्या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळालं.हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारसी अशा सगळ्याच धर्माच्या वेशभूषा परिधान करून विविधतेत एकतेचा संदेश दिला.

जलदिंडी

गेल्या काही वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळामुळे आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पिण्याच्या पाण्याचं पृथ्वीतलावरचं  प्रमाण हे कमी होऊ लागले आणि म्हणूनच एक जलदिंडी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली होती. पाणी वाचवलं नाही तर ज्या पद्धतीने देव दिसत नाही त्या पद्धतीने पाणी ही आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणूनच या दिंडीमध्ये एका पालखी मध्ये देवाचा फोटो ठेवण्याऐवजी कळशी तांब्या आणि पहिला ठेवण्यात आलेला होता. आणि यातूनच पाणी वाचवण्याचा संदेश देण्यात आला होता.

शोभायात्रेत मॅचिंग साड्यांची थीम

डोंबिवलीतल्या शोभायात्रेमध्ये अनेक जण सहभागी होत असतात काहीजण सायकलवर स्वार होतात तर काही महिला या बुलेट चालवून आपण देखील सक्षम असल्याचा संदेश दिला. तसेच महिलांनी मॅचिंग साड्यांची थीम घेऊन त्या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला होता.

मतदान करण्याच्या ग्रंथाल्याच्या संदेश

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे, सुयोग्य मतदारांनी मतदान करावं असं अपील डोंबिवली ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आलं होतं

गडकिल्यावरच्या शिल्पचित्रांचं प्रदर्शन

शोभायात्रेत जवळपास प्रत्येक डोंबिवली सहभागी झाले होते, या प्रत्येकांनी चित्ररथ किंवा पदयात्रेच्या माध्यमातून संदेश दिला. डोंबिवली पूर्वेला ट्रेक क्षितिज या संस्थेच्या द्वारे गडकिल्याचा इतिहास सांगणाऱ्या एका गडावरच्या शिल्पचित्रांच्या प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं होतं.

शोभायात्रा पहाण्यासाठी डोंबिवलीत काश्मीरी मुली

डोंबिवलीतली शोभायात्रा आता इतकी प्रसिद्ध झालीये की या शोभायात्रेत सहभागी होण्याचा मोह काश्मीर मधील मुलींना देखील आवरला नाही. हम या संस्थेने घेतलेल्या पुढाकारामुळे जवळपास 23 काश्मीरी मुली शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी काश्मीरहून आल्या होत्या.

29Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *