Fri. Jan 28th, 2022

नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त साकारली महाकाय रांगोळी

रांगोळीला भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे. एखाद्या पारंपारिक सणांना रांगोळीचे महत्त्व वेगळेच असते. उद्याच्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे महाकाय रांगोळी साकारण्यात आली. तब्बल 25 हजार चौरस फूट आकाराची ही रांगोळी आहे. या रांगोळीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. रांगोळी रेखाटण्यासाठी जवळपास 500 कलाकारांनी सहभाग घेतला होता. नाशिकरांनी गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाचं स्वागत हे अशा अनोख्या पद्धतीने केले आहे.

अशी साकारली ही महाकाय रांगोळी 

गुढीपाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.

या दिवसापासून नविन वर्षाला सुरूवात होते.

हा सण महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरा केला जातो.

पारंपारिक सण साजरे करण्यामध्ये नाशिककर अव्वल आहेत.

याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

उद्याच्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभुमीवर नाशिक मधल्या रामकुंड येथे जवळपास ५०० कलाकारांनी महाकाय रांगोळी रेखाटली.

ही रांगोळी तब्बल 25  हजार चौरस फुटांची आहे.

या रांगोळीच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचे दर्शन यावेळी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *