Thu. May 6th, 2021

गुजरातमध्ये कोविड केअर सेंटरला भीषण आग

गुजरातमधील भरुच येथील एका कोविड केअर सेंटरला भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. भरुच येथील पटेल वेलफेअर रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटरला रात्री १२.३० च्या सुमारास ही आग लागली.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, तर रुग्णालयातील इतर रुग्णांना जवळील रुग्णालयांत दाखल करण्यात येत आहे.भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाले. या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *