Sat. Aug 17th, 2019

चिखलात सापडले एकाच कुटुंबातील 17 जणांचे मृतदेह

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरातच्या बनासकांठामध्ये पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. रेस्क्यु टीमला तिथे 25 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यापैकी 17 जण हे एकाच

कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. 

 

चिखतालून या सगळ्यांचे मृतदेह काढण्यात आलेत. मंगळवारी गुजरातमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांनी विमानातून पाहणी सुद्धा केली.

 

या पुरस्थितीमुळे 1 हजारपेक्षा जास्त पाळीव प्राण्यांचा सुद्धा मृत्यू झाला. एनडीआरएफ, बीएसएफ, आर्मी आणि एअरफोर्स परिस्थित नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध

पातळीवर प्रयत्न करतायत. पण, पावसामुळे तब्बल 100 गावांसोबतचा संपर्क तुटलाय तर 488 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान मोदींनी 500 कोटींची मदत

जाहिर केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *