Fri. Sep 24th, 2021

मराठी चित्रपट आता भारताच्या सीमा पारकरून दुबईत जाऊन पोहोचणार

वेदांगी कर्णिक:- मराठी चित्रपट आता भारताच्या सीमा पारकरून दुबईत जाऊन पोहोचणार आहे. ५ जी इंटरनॅशनलच्या वतीने २० ते २३ जानेवारी या कालावधीत दुबईत ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’चं आयोजन करण्यात आलं आहे. ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ ची संकल्पना खूप आगळीवेगळी असून यात बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये २०२१ या वर्षामधील बहुचर्चित पाच आगामी मराठी चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सोबत चित्रपटांची टीमही यावेळी उपस्थित राहणार असून ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे आगामी मराठी चित्रपटांचे ट्रेलर आणि टीझरही या सोहळ्यात दाखवले जाणार आहेत.

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ह्या बद्द्लची घोषणा करण्यात आली आहे. ऑर्गनाईझर साचिन कटारनावरे सहित निर्माता, दिग्दर्शक आणि जेष्ठ अभिनेते महेश कोठारे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव ह्या परिषदेमध्ये उपस्थित होते. कोठारे यांनी “५ चित्रपटांची मेजवानी ही आखाती देशातील मराठी प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाची भेट ठरणार आहे. आम्ही दुबईमधल्या रसिक-प्रेक्षकांना भेटण्यास आतुर आहोत”, अशी भावना व्यक्त केली आहे. सिद्धार्थने टाळेबंदी नंतर साता समुद्रा पार जाउन ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचणार आहे या बद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *